माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील निवासस्थानी ईडीच्या पथकाने शुक्रवारी छापेमारी केली. देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानीही छापे टाकण्यात आले.देशमुख यांचे सरकारी निवासस्थान ज्ञानेश्वरी येथेही छापे टाकण्यात आले.९ तास ईडी अधिकाऱ्यांनी दोन्ही निवासस्थांची झडती घेतली.ईडीच्या पथकांनी १६ काही कागदपत्रे जप्त केली. ईडी अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या कुटुंबीयांचे आणि निकटवर्तीयांचे मोबाइल आणि डिजिटल डाटा ताब्यात घेतला आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ईडी वगैरे यंत्रणा आमच्यासाठी नवीन नाहीत. याआधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणांकडून गैरवापर झाला आहे. अशा छाप्यांतून आणि चौकशीतून या यंत्रणांच्या हाती काही लागणार नाही. याची यत्किंचितही चिंता वाटत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
देशमुख यांनी दरमहिन्याला १०० कोटी रुपये हप्ता जमा करायला सांगितले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिरसिंग यांनी केले होते.या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने एप्रिलमध्ये दिल्लीत गुन्हा दाखल केला होता. याच आधारे ईडीने मे महिन्यात पैशाच्या अफारातफर प्रकरणी गुन्हा दाखल केला.