स्टार प्रवाहवर 2 मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत अभिनेता अभिजीत खांडकेकर गायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.या भूमिकेविषयी सांगताना अभिजीत म्हणाला, ‘आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक सुप्त इच्छा असते की, आपण मोठं झाल्यावर गायक व्हावं. या मालिकेच्या निमित्ताने गायक बनण्याची माझी ही इच्छा पूर्ण होत आहे. मी गायक नाही मात्र उत्तम कानसेन आहे. याआधी आरजे आणि सूत्रसंचालनाचा अनुभव असल्यामुळे संगीतक्षेत्राशी निगडीत सर्वच मान्यवरांसोबत भेटीचा योग आला आहे. त्यामुळे मालिकेत गायकाची भूमिका साकारणं अवघड नाही मात्र आव्हानात्मक नक्कीच आहे.याआधी मी साकारलेल्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. या नव्या कलाकृतीला देखील तेवढंच प्रेम मिळेल ही आशा आहे.’’


