‘शक्ति – अस्तित्व के एहसास की’ या लोकप्रिय मालिकेत काम करणारा अभिनेता अनिरुद्ध दवे भोपाळमध्ये एका वेब सीरिजचं शूटिंग करत होता. शूटिंग दरम्यान त्याची तब्येत बिघडली. २३ एप्रिलला त्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती.लक्षणे वाढत गेल्यामुळे भोपाळमधील एका रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते.
मात्र आठवड्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. गेल्या २२ दिवसांपासून अनिरुद्ध करोनाची लढाई लढतोय.करोनाचा संसर्ग फुफ्फुसांमध्ये ८५ टक्के इन्फेक्शन पसरल आहे.तसचं ऑक्सीजनची पातळी देखील खालावली आहे. काही दिवसांपूर्वी अनिरुद्धची पत्नी शुभीने एक पोस्ट शेअर करत बाळ आणि पतीला झालेली करोनाची लागण यात सर्व सांभाळणं कठीण जात असल्याचं सांगितलं होतं.
अनिरुद्धने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली होती , त्यामध्ये त्याने “आभार, हा खर तर खूप छोटा शब्द आहे. गेल्या २२ दिवसांपासून रुग्णालयातील बेडवर तुम्हा सर्वांच प्रेम, आशिर्वाद, प्रार्थना आणि आपुलकी मला जाणवतेय. पूर्णवेळ ऑक्सीजनवर आहे. मात्र तुमच्यामुळे हिम्मीत वाढली. अरे पण तुम्ही मोठी उधारी केली यार. १४ दिवसांनंतर आयसीयूच्या बाहेर आता थोडं बरं वाटतंय. फुफ्फुसांमध्ये ८५ टक्के इन्फेक्शन आहे. थोडा वेळ लागेल, घाई नाही. फक्त आता स्वत: श्वास घ्यायचा आहे मला. लवकरच भेटू. भावूक झालो तर माझं सॅच्युरेश कमी होतं. मी मॉनिटरमध्ये पहिलं. ” असं अनिरुद्ध म्हणाला आहे.