अभिनेता पुष्कर जोगच्या बहुप्रतिक्षित ‘अदृष्य’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज 

0
77

अभिनेता पुष्कर जोगच्या बहुप्रतिक्षित ‘अदृष्य’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले आहे.यात पुष्कर आणि मंजीरी फडनीस हॉरर अंदाजात दिसले असून या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख महत्वाच्या भुमिकेत दिसणार आहे.हा चित्रपट 13 मे रोजी रिलीज होणार आहे.

पुष्करने आज या चित्रपटाचे 1 मिनीट 42 सेकंदाचे ट्रेलर रिलीज केले आहे. या ट्रेलरवरूनच चित्रपट किती रोमांचक असेल याचा अंदाज येतो. सुरवातीलाच मंजिरी फडणीस आणि त्यानंतर लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख व पुष्कर जोग दिसतात. सिनेमा रहस्य, थरार आणि रोमांच यांनी पुरेपुर भरलेला असल्याचे हा ट्रेलर पाहताना जाणवते.

सिनेमाचे दिग्दर्शन प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर कबीर लाल यांचे आहे. अजय कुमार सिंह आणि रेखा सिंह हे निर्माते आहेत. आपला आगळा ठसा उमटवलेल्या मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि अनंत जोगही यात खास भूमिकांमध्ये बघायला मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here