अभिनेता मंगेश देसाई निर्माता म्हणून पदार्पण

0
55

अभिनेता मंगेशनं साहिल मोशन ही निर्मिती संस्था स्थापन केली असून, निर्माता म्हणून मंगेश देसाई पदार्पण करत आहे. चित्रपट निर्मितीविषयी मंगेश म्हणाला, ‘एवढी वर्षं अभिनय केल्यानंतर काहीतरी वेगळं करून पाहायची इच्छा होती. त्यामुळे आता चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल टाकलं आहे. कारण अभिनयाइतकीच चित्रपट निर्मितीही आव्हानात्मक काम आहे. आतापर्यंत विनोदी असो किंवा गंभीर भूमिका, मी माझं काम नेहमीच संवेदनशीलतेनं करत आलो. आता तीच संवेदनशीलता निर्माता म्हणून माझ्या पहिल्या निर्मितीतही प्रेक्षकांना दिसेल हा विश्वास आहे. चित्रपटाचे सर्व तपशील योग्य वेळी जाहीर करणार आहे.’

मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करण्यासाठी मंगेशनं कोणता विषय निवडला आहे, चित्रपटाचं नाव काय, लेखक, दिग्दर्शक, कलाकार कोण ही सगळीच माहिती अजून गुलदस्त्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here