अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0
104

बिग बॉस सीझन -13 चे विजेते सिद्धार्थ शुक्ला याचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ४० व्य वर्षी निधन झाले.मुंबईच्या कूपर रुग्णालयात त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मित्राने खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा सिद्धार्थ शुक्ला बेशुद्ध अवस्थेत पलंगावर पडलेला होता. यानंतर त्याने प्रथम पोलिसांना माहिती दिली आणि नंतर तो त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.

सिद्धार्थने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती . 2005 मध्ये त्याने वर्ल्ड बेस्ट मॉडेलचा कि ताबही जिंकला. सिद्धार्थ ‘बालिका वधू’ या मालिकेतून घराघरात पोहोचला. ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल -3’, ‘ आणि ‘दिल से दिल तक’ सारख्या मालिकांमुळेही तो प्रसिद्ध झाला. त्याने फियर फॅक्टर सीझन 7 देखील जिंकला. सिद्धार्थने सावधान इंडिया आणि इंडिया गॉट टॅलेंट सारखे शो होस्ट केले आहेत.

बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी त्याने काही औषधे घेतली होती. यानंतरच त्याला हृदयविकाराचा झटका आला.त्याने कोणते औषध घेतले होते हे स्पष्ट झालेले नाही.त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुणा नसल्याच डॉक्टरांनी सांगितले आहे.गेल्या 24 तासांदरम्यान सिद्धार्थच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चौकशी केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.चित्रपटसृष्टीत त्याच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here