चौराईतील कापुर्डा येथील रहिवासी सुरेश दहिया या शेतकऱ्याचे यकृत निकामी झाले आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या गंगा राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.डॉक्टरांनी त्यांना यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. यासाठी सुमारे 22 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. चौराईचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र बब्बी चौराई यांनी त्यांचे सहकारी पंकज साहू यांच्या ट्विटर अकाउंटवरुन सोनू सूद यांना सुरेश यांची अडचण सांगितली. त्यांचे ट्विट रिट्विट करून सोनू सूदने सुरेश दहिया यांना मदतीचे आश्वासन दिले.
सोनू सूदने सोशल मीडियावर लिहिले आहे- ‘सुरेश भाई, लवकरात लवकर बरे व्हा. तुमच्या यकृताची समस्या संपली म्हणून समजा… चहा-बिस्किट तुमच्यावर उधार राहिले.’ यानंतर सोनू सूदच्या टीमने सुरेश यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. गुरुवारी सुरेश दहिया यांचे यकृत प्रत्यारोपण दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात होणार आहे.