‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाद्वारे अभिनेते परमीत सेठी यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली. परमीत यांनी लोकप्रिय अभिनेत्री अर्चना पूरन सिंगसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाता आता 29 वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. परमीत यांनी त्यांच्या आईवडिलांना अर्चनासोबत लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले, तेव्हा आईवडिलांनी त्यांच्या नात्याला नकार दिला होता. अर्चनाने सांगितल्यानुसार, अभिनेत्री असल्याने परमीतच्या आई-वडिलांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. काहीही झाले तरी अर्चनाशीच लग्न करण्यावर परमीत ठाम होते.
अर्चना आणि परमीत यांनी कोणालाही न सांगता गुपचूप लग्न केले. र्चना आणि परमीत यांनी रात्री 11 वाजता लग्न करायचे ठरवले होते. त्यानंतर सर्व तयारी करण्यात आली होती. पण जेव्हा लग्नाचे विधी करण्यासाठी भटजींना बोलवण्यात आले तेव्हा त्यांनी असे लग्न होऊ शकत नाही असे सांगितले. लग्नासाठी मुहूर्त काढावा लागतो असेही त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी भटजींनी सांगितल्या प्रमाणे अर्चना यांनी मुहूर्त काढून लग्न केले.अर्चना आणि परमीत 30 जून 1992 रोजी लग्नगाठीत अडकले होते. त्यांना आयुष्मान आणि आर्यमान ही दोन मुले आहेत.


