‘बापमाणूस’ मालिकेत पल्लवीच्या आईची भूमिका साकारली अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे निधन झाले आहे.कोरोनाच्या दुस-या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोनामुळे अनेक कलाकारांना आपला जीव गमवावा लागला आहे. अभिलाषा काही कामानिमित्त वाराणसीला गेल्या होत्या. तिथे त्यांना ताप येत आल्याने त्या मुंबईत परतल्या.
कोरोना चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आल्याने त्या रुग्णालयात दाखल झाल्या. मागील चार दिवस अभिलाषा आयसीयूमध्ये होत्या. अखेर उपचारादरम्यान 4 मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.अभिलाषा यांनी ‘छिछोरे’ चित्रपटात डॉक्टरची भूमिका साकारली होती.