अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘The Incarnation- Sita’ चित्रपटाचे पोस्टर तिच्या शेअर केले आहे. ‘सीता – एक अवतार’ चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करायला मिळत असल्याने आनंद झाला आहे” असे हे पोस्ट शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी बॉलिवूडची करीना कपूरच्या नावाची चर्चा सुरु होती. या भूमिकेसाठी तिने 12 कोटी रुपये मानधन मागितल्याच्या बातम्या देखील माध्यमातून समोर आल्या होत्या.शिवाय सीतेच्या भूमिकेत करीनाच्या नावाला विरोधही झाला होता. मात्र आता या चित्रपटात सीतेची भूमिका अभिनेत्री कंगना रणौत साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे
चित्रपटाचे दिग्दर्शक अलौकिक देसाई यांनी कंगनासोबतचा एक फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे.निर्मात्या सलोनी शर्मा यांनी याची पुष्टी करताना सांगितले की, “सीता या चित्रपटात कंगना रनोटचे स्वागत करताना मला आनंद होतोय.या चित्रपटाचे लेखक केवी विजयेंद्र प्रसाद आहेत.


