अभिनेत्री स्मिता तांबे आणि धीरेंद्र यांनी लाडक्या लेकीचे नाव ठेवले वैदिका

0
102

छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे हिने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला. स्मिता आणि धीरेंद्र यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचे नाव वैदिका असे ठेवले आहे.’बुद्धीची देवता’असा वैदिका या नावाचा अर्थ होतो.आता नुकताच तिने लाडकी लेक आणि पती धीरेंद्र द्विवेदीसोबत एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘आईवडील म्हणून आमची निवड केल्याबद्दल तुझे आभार,’ असे स्मिताने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

स्मिता आणि धीरेंद्र द्विदेवी यांचे 18 जानेवारी 2019 मध्ये लग्न झाले. अलीकडेच ती छोट्या पडद्यावर ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत झळकली होती. ‘तुकाराम’, ‘जोगवा’, ‘72 मैल एक प्रवास’, ‘परतु’, ‘गणवेश’ या मराठी चित्रपटांमध्ये स्मिताने काम केले. याच बरोबर ती ‘सिंघम रिर्टन्स’, ‘रुख’, ‘नूर’, ‘डबल गेम’ या हिंदी चित्रपटांमध्येही ती झळकली होती. तर तिचा नवरा धीरेंद्र नाट्य कलाकार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here