
मुंबई: युवक बिरादरीचे ४८ वे राष्ट्रीय संमेलन दांडी स्मृतिदिनी १२ मार्चला विलेपार्ले येथील मकुेश पटेल सभागहात आयोजित करण्यात आले आहे. देश पातळीवर बिरादरीने योजलेल्या स्पर्धात्मक कार्यक्रमाचा अंतिम टप्पा पूर्ण होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/
जवळ जवळ 10 लाख रुपयांचे विविध पुरस्कार देशपातळीवरील नैपुण्य सिद्ध केलेल्या युवजणांना दिले जाणार आहेत. सकाळी 10:30 वाजता राज्यातील विविध भागातील ३० युवजन अभिरूप युवा संसद उपक्रमात ‘भारत 2047’ विधेयकावर वादविवाद करणार आहेत. त्यानंतरच्या सत्रात देशपातळीवरील प्रतिभा शोध या ७०० युवकांच्या सहभागातून अंतिम टप्प्यात पोहोचलेले १३ युवजन समूह चर्चा व स्वयंमूल्यांकनद्वारे अनुक्रमे ५०,०००/-,३०,०००/-,२०,०००/- रुपये पुरस्कारासाठी आपली गुणवत्ता सिद्ध करणार आहेत.
या निमित्त दुपारच्या सत्रात युवा चळवळीला सकारात्मक दिशा मिळावी म्हणून हाल-ए-दिल आणि दौर- ए-जमाना या चर्चा सत्रात निवडक प्रतिनिधी आपले विचार मांडणार आहेत. शेवटच्या सत्रात अभिषेक बच्चन यांच्याद्वारे स्वयं रोजगाराच्या क्षेत्रात ४० वर्ष सेवा बजावलेले मधुसूदन सोहनी,सामाजिक क्षेत्रात योगदान दिलेले संदेश जाधव, उद्योग जगतात आपला ठसा निर्माण करणाऱ्या रेखा राठी यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाआधी बिरादरीचे 40 कलाकार वेद काळ ते गांधी युग व पंडीत नेहरू ते नरेंद्र मोदींपर्यंत 5000 वर्षांच्या इतिहासावर बॅले द्वारा कलाकृती सादर करणार आहेत.


[…] वेंगुर्ला प्रतिनिधी- जागतिक महिला दिनानिमित्त लिनेस क्लब वेंगुर्ला व टांककर शेटये ट्रस्ट यांच्यावतीने वेंगुर्ला येथील ग्रामीण रुग्णालयात सुदृढ माता व बालक स्पर्धा घेण्यात आली. यात सहभागी झालेल्या ६० मुले व ५८ महिलांची शारीरिक तपासणी व बौद्धिक चाचणी घेण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/अभिषेक-बच्चन-यांच्या-हस्/ […]