तालिबान समर्थकांनी ट्विटरवर लिहिले – ‘आणि अमेरिका गेली, युद्ध संपले. ‘तालिबानशी झालेल्या कराराअंतर्गत अमेरिका 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तान पूर्णपणे सोडून देणार होता. पण अमेरिकेने चोवीस तासांपूर्वीच अफगाणिस्तान सोडले. अमेरिकन लष्करी वाहतूक विमाने C-17 काबूल विमानतळावरून उड्डाण करताच तालिबान लढाऊंनी आनंदात गोळीबार केला.
काबूल विमानतळ आता कोणाच्याही नियंत्रणाखाली नाही आणि हवाई वाहतूक नियंत्रणसुद्धा नाही. म्हणजेच काबूल विमानतळावरून विमानाचे उड्डाण किंवा उतरणे सुरक्षित नाही. काबूलच्या लोकांनो, घाबरू नका, या गोळ्या हवेत सोडल्या जात आहेत. मुजाहिदीन स्वातंत्र्य साजरा करत आहेत असे त्यांनी अफगाण नागरीकांना जाहीर केले आहे.अमेरिकेने आपली अनेक विमाने आणि गोळा बारूत तिथेच सोडले आहे. त्यावर तालिबान्यांनी कब्जा केला आहे.