अमेरिका : शार्कच्या हल्ल्यात मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर कॅलिफोर्नियाचे समुद्रकिनारे बंद !

0
131

कॅलिफोर्नियाच्या अधिकाऱ्यांनी सॅन लुईस ओबिस्पो काउंटीमधील काही समुद्रकिनारे बंद केले आहेत. शुक्रवारी शार्कच्या झालेल्या हल्ल्यात एका 31 वर्षीय व्यक्तीला सॅन लुईस ओबिस्पो काउंटीमध्ये मृत घोषित करण्यात आले आहे. लॉस एंजेलिस आणि जॅन जोसच्या मध्यभागी असलेल्या परिसरात 18 वर्षांमध्ये शार्कच्या हल्ल्यातील हा पहिला मृत्यू झाला आहे.

शनिवारी, काउंटीचे अधिकारी अद्याप त्या व्यक्तीची ओळख जाहीर करण्यापूर्वी नातेवाईकांशी संपर्क साधण्याच्या प्रक्रियेत होते, असे मोरो बे हार्बर गस्त संचालक एरिक एंडर्सबी यांनी सांगितले.”हा एक भयानक अपघात असून सुदैवाने, सध्या पडत असलेला पाऊस आणि सर्फिंगला हवामान योग्य नसल्यामुळे समुद्रात सर्फरची संख्या कमी होती. नाहीतर अनर्थ ओढवला असता असे सी एन एनला संगितले. याशिवाय सुरक्षिततेसाठी कॅलिफोर्नियातील अनेक समुद्रकिनारे बंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले..”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here