पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीला 4 दिवसांसाठी अमेरिकेला गेले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान मोदींना परत निघण्यापूर्वी एक अमूल्य भेट दिली. बायडेन यांनी मोदींना भारताच्या 157 कलाकृती आणि पुरावशेष परत दिले. या कलाकृतीं परत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आणि बायडेन यांचे आभार मानले. या कलाकृतीं दुसरे शतक ते 18 व्या शतक प्राचिन आहेत.
मोदी म्हणाले की, कलाकृती आणि पुरातन वास्तू कोणत्याही देशाचा अमूल्य ठेवा आहे. तो सुरक्षित आणि संरक्षित ठेवून जपणे हि आपल्या सांस्कृतिक वारस्याची सुरक्षा आहे. भारत आणि अमेरिका सांस्कृतिक वारसांची चोरी, बेकायदेशीर व्यापार आणि तस्करांचा सामना करण्यासाठी प्रयोग आणि मजबूतीसाठी प्रतिबध्द आहे.
या 157 कलाकृती आणि पुरावशेषमध्ये 10 व्या शतकातील आहेत.यामध्ये बलुआ दगडापासून तयार केलेली दीड मीटरच्या नक्काशीपासून 12 व्या शतकातील उत्कृष्ट कांस्य धातूची 8.5 सेंटीमीटर उंचीची नटराज यांची मूर्तीदेखील आहे.पंतप्रधान कार्यालय (PMO) नुसार, यामध्ये जास्तीत जास्त वस्तू 11 व्या शतकापासून 14 व्या शतकाच्या आहेत. या सर्व मूर्ती ऐतिहासिक आहेत.
यामध्ये मानवरुपी तांब्याच्या 2000 ईसा पूर्वी वस्तु तसेच दुसऱ्या शतकातील टॅराकोटाच्या फुलदाणीचा समावेश आहे.सुमारे 71 प्राचीन कलाकृती सांस्कृतिक आहेत, तर उर्वरित लहान मूर्ति आहेत ज्या हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माशी संबंधित आहेत. हे सर्व धातू, दगड आणि टॅराकोटपासून बनलेले आहे. कांस्यच्या वस्तूंमध्ये लक्ष्मी नारायण, बुद्ध, विष्णु, शिव-पार्वती आणि 24 जैन तीर्थंकरच्या वस्तूंचाही समावेश आहे. अनेक इतर कलाकृतींचा देखील समावेश आहे, ज्यामध्ये कनकलामूर्ति, ब्राह्मी आणि नंदीकेसाचा समावेश आहे.