अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली. कमला हॅरिस यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत.मात्र, त्यांची रॅपिड आणि पीसीआर टेस्ट पॉझिटिव्हआ आली आहे.कमला हॅरिस यांना त्यांच्या निवासस्थानीच क्वारंटाईन करण्यात आले आहे.त्या आपल्या कामकाजावर घरी राहूनच लक्ष ठेवणार आहेत.
कमला हॅरिस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत. 1 एप्रिल रोजी कोरोनाचा अतिरिक्त बूस्टर डोस देखील त्यांनी घेतला होता.कमला हॅरिस यांचे पती डग इमहॉफ यांना गेल्या मार्च महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. पण त्यावेळी कमला हॅरिस यांची कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.
गेल्या आठवड्यात अमेरिकेत 12 हजारांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळले होते. अमेरिकेत सध्या कोरोनामुळे दररोज 300 ते 400 जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती न्यूयॉर्क टाइम्स दिली आहे.