विद्यालयातील कोविड लसीकरण केंद्राला वॅक्सिन कॅरियर बॉक्स भेट.
मंदार चोरगे / वैभववाडी
वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या मागणी नुसार अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे सुरू असलेल्या लसिकरण केंद्राचा विद्यालयाचे विद्यार्थी, पालक वर्ग व इतर नागरिक यांना चांगलाच फायदा होत आहे.
काल १ जुलै जागतिक डॉक्टर्स दिन जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सध्याच्या कोरोनाच्या काळात ‘देवमाणूस’ म्हणूनच डॉक्टरांकडे पाहिले जात आहे. त्यामुळे डॉक्टरांचे महत्व अधोरेखित आहे. या डॉक्टरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा कालचा दिवस ‘डॉक्टर डे’ याचे औचित्यसाधून अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे सुरू असणाऱ्या कोव्हिड लसिकरण केंद्राला व्हॅक्सिन कॅरियर बॉक्स भेट स्वरूपात देण्यात आला.
यावेळी संस्थेचे अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष व माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे,वाभवे- वैभववाडी नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष रोहन रावराणे, माजी नगरसेवक संजय सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर सर, डॉ.संजय मराठे, ज्येष्ठ व्यापारी तुकाराम घोणे, माजी सरपंच सदा माईनकर, बाळा पारकर ,संजय रावराणे याशीवाय डॉक्टर कुंभार ,आरोग्य सहाय्यिका जांभवडेकर मॅडम ,आरोग्य सेविका नीलम कदम, श्री. रेवडेकर तसेच लसिकरण केंद्रावर उपस्थित ४५ वर्षावरील लसघेण्यास आलेले लाभार्थी उपस्थित होते.