अर्थसंकल्पात राज्यातील भूविकास बँक कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी;सिंधुदुर्गातील ७५ कर्मचाऱ्यांच्या पगाराची सुमारे १५ कोटी रक्कम मिळणार!

0
38

भूविकास बँक कर्मचाऱ्यांनी आ. वैभव नाईक यांचे मानले आभार

प्रतिनिधी -पांडुशेठ साठम

कुडाळ: राज्यातील भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे थकीत असलेले पगार व इतर सर्व आर्थिक लाभ, व शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा काल जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी १० वर्षे प्रलंबीत असलेला प्रश्न मार्गी लावला आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याबद्दल सिंधुदुर्गातील भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आज आमदार वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे भेट घेत पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

भूविकास बँकेच्या सिंधुदुर्गातील ७५ कर्मचाऱ्यांच्या पगाराची सुमारे १५ कोटी रक्मम मिळणार आहे. तर जिल्ह्यातील सुमारे १०० शेतकऱ्यांची ४० लाख रु ची कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.याबाबत सिंधुदुर्ग भूविकास बँक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील यांनीही आ. वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला.याप्रसंगी चंद्रकांत सरंगले, सुहास सावंत, नंदकुमार कासले, उत्तम राणे,गौतम कासले आदी उपस्थित होते.

        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here