कोकणात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडेच रस्ते खचल्याच्या बातम्या येत आहेत. नद्यांच्या पाण्याच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाच्या जोराने एकीकडे बळीराजा सुखावला असला तरी दरड कोसळणे ,रस्ता वाहून जाणे यासारख्या घटना घडत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील अलोरे येथील EVT पोफळी प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्या बातमी हाती आली आणि लागलीच स.पो.नि. पाटील व अंमलदार यांनी तेथे जाऊन रस्त्यावरील दरड बाजूला करून रस्ता वाहतुकीकरिता खुला करून दिला. प्रशासनाच्या या त्वरित हालचालींमुळे नागरिकांना अडचणीतून वाट काढणे सोपे झाले .