कोरोना हेल्थ ग्रुप असोसिएशन आणि वर्ल्ड अॅग्रोकेअर फाउंडेशनद्वारे संयुक्तपणे ऑक्सिजन बँक चालविली जाते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोकांना ऑक्सिजनसाठी भटकावे लागत आहे. या बँक मोहिममुळे अंदाजे 50 लोकांना योग्य वेळी ऑक्सिजन मिळाले असून त्यांचा जीव वाचविण्यांत यश मिळाले आहे.ऑक्सिजन बँकने कोरोना पेशंट आणि इतर गंभीररित्या आजारी असलेल्या जवळपास 200 रुग्णांना यावेळी मोफत ऑक्सिजन दिले आहेत तर काहींना अगदी नाममात्र दरावर पोर्टेबल ऑक्सिजनच्या बॉटल दिल्या आहेत .
या व्यतिरित्क 100 पोर्टेबल ऑक्सिजनचा स्टॉक असून आता या स्टॉकमध्ये वाद करण्यात आली आहे.ही बँक १४ मित्रांच्या सहकार्याने चालू करण्यात आली आहे आणि या बँकेसाठी प्रत्येकाने काही लाखांची मदत केली आहे. हे देवाचे काम आहे. आयुष्यात असे चांगले काम करण्याची खूप कमी संधी मिळते. यासाठी आम्ही आतापर्यंत किती पैसे खर्च केले. याविषयी सांगून मानव सेवेसाठी केलेल्या कामाचे महत्त्व कमी करणार नाही असेही या मित्रांनी सांगितले आहे .