दापोली :- समुद्राला आज दुपारी आलेल्या भरतीच्या वेळी आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर तेलाच्या गुठळ्या लाटांबरोबर वहात आल्याने हा किनारा काळवंडला आहे . समुद्रातून जाणाऱ्या एखाद्या जहाजातून तेलाची गळती झाल्यामुळे अथवा वापरलेले तेल समुद्रात सोडले गेले असल्यास हा प्रकार घडलेला असावा असे मत व्यक्त केले जात आहे.