आंध्रप्रदेशात कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे.आंध्रप्रदेशातील कुर्नुल येथे प्रथम या स्ट्रेनची ओळख पटली आहे. हा कोरोनाचा नवीन स्ट्रेन सामान्य लोकांमध्ये खूप लवकर पसरतो.या स्ट्रेनने संक्रमित रुग्णाला 3-4 दिवसात ऑक्सिजनच्या कमतेरतेमुळे धाप सुरु होते. यालाच हायपोक्सिया किंवा डिस्पेनियाअसे शास्त्रीय भाषेत नाव आहे. जर योग्य वेळी उपचार आणि ऑक्सिजन सपोर्ट मिळाला नाही तर रुग्णाचा मृत्यू होतो. या नवीन स्ट्रेलान एपी स्ट्रॅन (AP Strain)आणि एन440के (N440K ) असे नाव देण्यात आले आहे.