रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट गेले दहा दिवस अतिवृष्टीमुळे बंद आहे. रस्ता ज्या ठिकाणी खचला आहे त्या ठिकाणी विरुद्ध दिशेला नवीन रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे.कोसळलेल्या दरडी बाजूला करण्याचे काम जवळ जवळ पूर्ण होत आले आहे. सध्या अत्यावश्यक सेवेची वाहतूक आंबा घाट बंद असल्याने अणुस्कुरा मार्गे सुरू आहे. त्यामुळे आधीच इंधन दरवाढ आणि त्यात हे वाढणारे अंतर यामुळे नुकसान होत आहे. जवळ जवळ दहा दिवस हा घाट बंद आहे.गटाराच्या बाजूने पाईप टाकून त्यावर कॉक्रिटीकरण करत रस्ता लौकर पूर्ण करून वाहतूक सुरु करंण्याचा प्रयत्न आहे
या कमी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय हायवे प्राधिकरण तसेच राष्ट्रीय महामार्ग साखरपा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी घाट रास्ता रस्ता लवकर सुरू व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. पोलीस प्रशासन रस्त्यावर करडी नजर ठेऊन आहेत. अनेकजण घाट केव्हा सुरू होणार याकडे लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे आंबा घाट लवकर सुरू व्हावा अशा सर्वसामान्य नागरिकांमधून भावना व्यक्त होत आहेत..