आज पुण्यात राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या १४९ व्या अभ्यासक्रमाची पासिंग आउट परेड आयोजित.
पुणे – आज पुण्यात राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या १४९ व्या अभ्यासक्रमाची पासिंग आउट परेड आयोजित. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या १४९ व्या अभ्यासक्रमाची पासिंग आउट परेड काल सकाळी पुण्यातील खडकवासला येथील खेत्रपाल परेड ग्राउंडवर पार पडली. नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी परेडचा आढावा घेतला. एकूण ३२९ कॅडेट्सना सशस्त्र दलात कमिशन देण्यात आले.

कॅडेट सिद्धार्थ सिंहयांनी परेडचे नेतृत्व केले. राष्ट्रपतींचे सुवर्णपदक दीपक कांडपाल यांना, रौप्यपदक सिद्धार्थ सिंह यांना आणि कांस्यपदक सिद्धार्थ जैन यांना देण्यात आले. चीफ ऑफ स्टाफ बॅनर गोल्फ स्क्वॉड्रनला प्रदान करण्यात आला. १४९ व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्लाह हॉल येथे आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये यूपीएससीचे अध्यक्ष
डॉ. अजय कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एकूण ३२८ कॅडेट्सना पदवी मिळाली, ७२ जणांना विज्ञान विषयात, ९२ जणांना संगणक विज्ञान विषयात आणि ५२ जणांना कला विषयात पदवी मिळाली. मित्र राष्ट्रांमधून १८ जणांना पदव्या देखील प्रदान करण्यात आल्या. याव्यतिरिक्त, नौदल आणि हवाई दलातील ११२ बी.टेक कॅडेट्सना तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे प्रमाणपत्र मिळाले.


