प्रतिनिधी: अभिमन्यू वेंगुर्लेकर
कणकवली- कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आमदार नितेश राणे राधानगरी फोंडाघाट मार्गे सिंधुदुर्गात दाखल झाले. राणे हे कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात दाखल होते. तेथून ते कणकवली मार्गे सावंतवाडीत दाखल झाले येथे ते जामिनाची पूर्तता करणार आहेत. मात्र येथून कुठे जाणार याची अद्याप निश्चिती नाही. राणे यांना कणकवली येथे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. राणे येणार म्हणून कारागृह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आमदार नितेश राणे यांच्या छातीत दुखू लागल्याने वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना गेल्या चार दिवसापासून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. यानंतर आज त्यांना सीपीआर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत.