प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
मुंबई– एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडानंतर आता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर राज्याचे लक्ष लागले आहे. नाराज आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे सुरतला गेल्यानंतर त्यांनी पहिल्या ट्विटमधून तीन महत्वाच्या बाबी समोर आली आहे.
बंडावरुन आता माघार नाही तर आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नेतृत्वच त्यांना मान्य नसल्याचेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय हिंदुत्वाच्या मुद्याला हात घातल आता शिवसेनेला आपल्या हिंदुत्वाचा विसर पडत असल्याची जाणीवही त्यांनी यामधून करुन दिली आहे. पक्षाबद्दल आपले मत व्यक्त करीत असताना एकनाथ शिंदे यांनी मात्र, आपल्यावर बाळाहेब ठाकरे यांचे विचारांचा प्रभाव आहे तर आनंद दिघे यांची शिकवण असल्याची जणूकाही जाणीवच करुन दिली आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्वावर ते किती नाराज आहेत. याचा अंदाज येत आहे.


