सिंधुदुर्ग औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओरोस येथे ऑगस्ट 2021 ची प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पध्दीतीने सुरू होणार आहे. या संस्थेत असलेल्या व्यवसाय व प्रवेश क्षमताची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
वेल्डर-20, डिझेल मॅकेनिक -24,फुड प्रोडक्शन (जनरल)-48, ड्रेस मेकींग-20, फ्रंट ऑफिस असिस्टंट-24, फुड अँड बेव्हरेजीस सर्व्हीस असिस्टंट-20, इलेक्ट्रीशियन-20, मॅकेनिक मोटार व्हेईकल -24, फिटर-20, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक-24, ड्राप्टस्मन (मॅकेनिकल)-20, इन्फॅार्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टीम मेंटेनन्स-24,
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे – इयत्ता 10 वी उत्तर्ण गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र (आरक्षणांतर्गत प्रवेशासाठी इच्छुक असल्यास), आर्थिक वर्ष 2020-21 चे नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (इ.मा.व. वि.मा.प्र.एन.टी(ए,बी,सी,डी ) या आरक्षणांतर्गत प्रवेश घ्यावययाचा असल्यास ), खेळाचे प्रमाणपत्र (जिल्हास्त्र, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर,), पाठ्ठयात्तर (एन.सी.सी,एम.सी.सी, स्काऊट गाईट), इंटरमिजीएट ड्रॉईग परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र, माजी सैनिक व माजी सैनिक पाल्य,प्रकल्प ग्रस्त, अपंग, बोल्स्टर स्कूल या अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवरांनी संबंधित प्राधीकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र (असल्यास),
प्रशिक्षणार्थ्यांसाठी संस्थेतील सोई व सुविधा– व्यवसयनिहाय तज्ञ निदेशक कर्मचाऱ्यांची उपलब्धता, संस्थेमध्ये ये-जा करण्यासाठी एस.टी. पासची सुविधा, संस्थेमध्ये व्यवसाय निहाय प्रशिक्षणासाठी लागणारे यांत्रिक उपकरण व हत्यारांची उपलब्धता, प्रशस्त वर्क शॉप व प्रशासकीय इमारत, मुले व मुलीसाठी स्वतत्रं स्वच्छतागृह व पाण्याची सुविधा, मागासवर्गीय पात्र उमेदवारासाठी प्रशिक्षण शुल्क माफ, अनुसूचीत जमाती प्रवर्गातील पात्र प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांसाठी दरमहा रुपये 500/- निर्वाह भत्ता, आर्थिक दृष्टया कमकुवत प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांसाठी दरमहा रुपये 40/- विद्यावेतन, अनुसुचीत जाती प्रवर्गातील पात्र प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांसाठी दरमहा रुपये 20 /- विद्यावेतन, अनुसुचीत जाती प्रवर्गातील पात्र प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांसाठी व्यवसायांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना व्यवसायाचे टूलकिट सुविधा, ही संस्था कुडाळ तालुक्यात असल्याने तालुक्यातील हायस्कुलमधून इयत्ता 10 वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशामध्ये मेरीटनुसार 70 टक्के प्राधान्य राहील.
यासंस्थेतील प्रवेशासंबंधीच्या माहितीसाठी जे.एल.गवस, गटनिदेशक मो. 9423302138, एस.एस.लिखारे शिल्पनिदेशिका मो.9834681411, ए.जे.तोरस्कर ,कनिष्ठ लिपिक मो.9673680879 यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती प्राचार्य औदयोगिक प्रशिक्षण संस्था ओरोस यांनी दिली