प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी- गुहागर तालुक्यात असलेल्या रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्ट या कंपनीमधील कर्मचाऱ्यांचा रोजगार टिकून राहावा यासाठी प्रयत्न करणारे आमदार भास्कर जाधव हे अडचणीत आलेला हा प्रकल्प चालू राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी याप्रश्नी लवकरच दिल्लीमध्ये पेट्रोलियम मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. यावेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.


