देवगड : आरे गावातील वाढत्या माकड उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना अखेर दिलासा मिळाला आहे. माड, पेरू, भात शेती आणि घरांची हानी करणाऱ्या माकडांच्या पकडीसाठी फॉरेस्ट विभागाने पिंजरे बसविण्याची कारवाई सुरू केली आहे.
ही कारवाई माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शक्य झाली. यावेळी माजी सदस्य प्रसाद कांबळे, माजी सरपंच सहदेव कांबळे, प्रकाश मडव, शमीन साहिल, तसेच वनविभागाचे श्री. राणे, श्री. तेली आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे गावात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला काहीसा दिलासा मिळाला आहे.


