क्रूझ ड्रग्स प्रकरणामध्ये शारूखचा मुलगा आर्यन खानला अटक झाली आणि अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अगदी आर्यन खान जवळ न मिळालेल्या अमली पदार्थ ते त्याची अटक यापासून NCB अधिकारी समीर वानखेडेंचे २५ कोटीच्या लाच मागण्यापर्यंत अनेक गोष्टी बाहेर आल्या. 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने आर्यनला ताब्यात घेतले होते. तर 8 ऑक्टोबरपासून तो आर्थर रोड तुरुंगात आहे.आज या प्रकरणावर सुनावणी होती.अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजुर केला.
आज गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनला सशर्त जामीन मंजुर केला.आर्यनच्या जामीन पत्रावर अभिनेत्री जुही चावला हिने सही केली आहे.आज सेशन्स कोर्टात जुही वकील सतीश मानेशिंदे यांच्याबरोबर हजर झाली होती. आर्यनच्या जामीन पत्राला जुहीचे पासपोर्ट, आधार कार्ड कागदपत्रांसोबत जोडण्यात आले आहेत. न्यायमूर्तींनी जुहीची सर्व कागदपत्रे तपासली आहेत. ती आर्यनला जन्मापासून ओळखते. त्यामुळे जामीनदार म्हणून जुही चावलाने सही केली आहे.
आर्यनच्या जमीनपत्राची प्रत आर्थर तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्याची सुटका होईल. जामिनावर बाहेर आल्यानंतर आर्यनला काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्याला त्याचा पासपोर्ट स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करावा लागाणार आहे .त्याला कोणत्याही प्रसार माध्यमांशी या विषय संबंधात बोलता येणार असून न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्याला भारताबाहेरही जाता येणार नाही.त्याचप्रमाणे त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या केसनुसार जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल त्यानुसार एनसीबीला त्याला सहकार्य करावे लागेल आणि महत्वाचे म्हणजे यापैकी कोणतेही उल्लंघन केल्यास त्याचा जामीन रद्द केला जाईल.