प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
नगरचे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांची प्रकृती आज अचानक बिघडली. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे 30 मेपर्यंतचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
यासंदर्भात इंदुरीकर महाराज यांच्याकडून एक पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात त्यांनी आपल्या प्रकृतीबद्दल सांगतानाच वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्वनियोजित कार्यक्रम पार पडतील असे म्हटले आहे. कार्यक्रम रद्द करावे लागल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सर्वांचे आशीर्वाद पाठीशी आहेत, असेच प्रेम कायम लाभावे ही अपेक्षा, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.