केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची तारीख पुन्हा एकदा वाढव ण्यात आल्याचे जाहीर केले आहे. इन्कम टॅक्स रिटर्न आता 15 मार्चपर्यंत भरता येणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसकडून मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न भरण्याची तारीख 15 मार्च पर्यंत वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
आयकर रिटर्नची भरण्यासाठीची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 होती पण CBDT कडून सांगण्यात आले की कोरोना महामारीच्या वाढत चाललेल्या संक्रमणामुळे करदात्यांना अडचणी येत असून त्यामुळे ITR भरण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. प्राप्तिकर कायदा 1961 च्या तरतुदींनुसार विविध लेखापरीक्षण अहवाल ई-फायलिंग करताना येणाऱ्या समस्यांमुळे ही मुदत वाढवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.


