गुजरातमधील अदानी बंदरात अलीकडेच मोठ्या प्रमाणावर ड्रग्स पकडले गेले. सप्टेंबरमध्ये गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर 3,000 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. हे बंदर अदानी ग्रुपद्वारे चालवले जाते. या ड्रगची किंमत 21 हजार कोटी रुपये होती.
देशातील कार्गो हाताळणीमध्ये अदानी समूहाचा 25% वाटा आहे. पोर्ट 13 वर अदानी कंपनी आपले कामकाज चालवते. त्यामुळे इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून येणाऱ्या कार्गोला अदानी कंपनीने त्याच्या टर्मिनलवर माल उतरवणे बंद केले आहे. हा निर्णय 15 नोव्हेंबरपासून लागू होईल. असे निवेदन अदानी कंपनीने जारी केले आहे.
जप्त केलेल्या हेरॉईनमध्ये मोठ्या-मोठ्या पिशव्या होत्या. त्यात हिरोईन व्यतिरिक्त बरीच सामग्री होती. पिशवीत सापडलेली ड्रग्स बॅगच्या खालच्या भागात ठेवली गेली होती आणि वर पावडर भरण्यात आले होते. जेणेकरुन हिरोईन सापडू नये. या जप्तीनंतर देशव्यापी ऑपरेशन सुरू करण्यात आले आणि 8 लोकांना अटक करण्यात आली. त्यात अफगाणिस्तान आणि उज्बेकिस्तानचे नागरिकही होते.नंतर हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आले. रविवारी एनआयएने अनेक ठिकाणी छापेही घातले. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. ही भारतातील सर्वात मोठी ड्रग्सची जप्ती आहे. एनआयएने चेन्नई, कोईमतूर, विजयवाडा येथे छापा टाकला आहे. यासह, आणखी अनेक राज्यांमध्ये छापेमारी केली जात आहे.