उत्तन-विरार सागरी महामार्ग आता वधवण बंदरापर्यंत; मुंबई किनारपट्टीला मोठा बूस्ट

0
40
मुंबई किनारपट्टीला मोठा बूस्ट
उत्तन-विरार सागरी महामार्ग आता वधवण बंदरापर्यंत; मुंबई किनारपट्टीला मोठा बूस्ट

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील किनारपट्टीवरील वाहतुकीस नवा वेग देणारा उत्तन–विरार सागरी महामार्ग प्रकल्प आता वधवण बंदरापर्यंत विस्तारित होणार आहे. या विस्ताराला राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मान्यता दिली असून, या बैठकीचं अध्यक्षस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात घेतलं. https://sindhudurgsamachar.in/छत्तीसगडमधील-बिलासपूरजव/

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकल्पाची एकूण लांबी ५५.१२ किलोमीटर असेल. यामध्ये २४.३५ किलोमीटर लांबीचा मुख्य सागरी पूल, तसेच उत्तनहून ९.३२ किमी, वसईहून २.५ किमी आणि वीरारहून १८.९५ किमी लांबीच्या संपर्क रस्त्यांचा समावेश असेल.

वधवण बंदरापर्यंत प्रकल्पाचा विस्तार झाल्याने उत्तर-दक्षिण किनारी संपर्क अधिक मजबूत होईल, तसेच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, एस.व्ही. रोड आणि लिंक रोडवरील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here