महाराष्ट्रातील 12 प्रवाशांना घेऊन बोलेरो कार दरीत कोसळून तीन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. हे प्रवासी जानकीछत्ती येथून बरकोटकडे निघाले होते.रात्री उशिरा ही कार यमुनोत्री धामपासून 28 किमी अंतरावर असलेल्या ओझरीजवळ पोहोचले. एका बसला साईड देण्याच्या नादामध्ये हा अपघात झाला. कार चालकाने बसला साईड देण्यासाठी बोलेरो कार बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात बोलेरो कार चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट खोल दरीमध्ये कोसळली.
रात्री अंधार असल्यामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. या अपघातामध्ये महाराष्ट्रातील 3 भाविकांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. जखमींमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या अपघातामध्ये मुंबईतल्या अंधेरीमध्ये राहमारे पूरण नाथ (वय 40), भंडाऱ्याच्या जयश्री अनिल कोसरे (वय 26 आणि नागपूरच्या अशोक महादेव राव (वय 40) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सर्व जखमींची प्रकृची चांगली असून ते धोक्याच्या बाहेर आहेत. लहान मुलं देखील धोक्याच्या बाहेर आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.


