उत्साही वातावरणात घरोघरी गणपतीचे पूजन

0
27

वेंगुर्ला प्रतिनिधी-वेंगुर्ला तालुक्यासह शहरात घरोघरी आज उत्साहपूर्ण वातावरणात गणपतीचे पूजन करण्यात आले. गणपती शाळेतून गेले दोन दिवस गणपती घरी नेतानाचे चित्र आजही सकाळही पहायला मिळाले.

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणपतीचे पूजन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार आज घरोघरी गणपतींचे पूजन करण्यात आले. गेले दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटी, नियमांना अधिन राहून हा सण साजरा करावा लागला होता. यावर्षी मात्र, कोणतेच निर्बंध नसल्याने भक्तांच्या चेह-यावर उत्साही वातावरण पहायला मिळत आहे. आज पहाटेपासूनच घरोघरी गणपतीच्या पूजनाला प्रारंभ झाला. ब्राह्मणांच्या मंत्रघोषात, फटाकांच्या आतषबाजीत पूजन करण्यात आले. घरोघरी आरतीचेही सूर निनादू लागले आहे. भजनाच्या माध्यमातून गणेशाची सेवा करण्यासाठी भजन मंडळेही सज्ज झाली असून सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत ही भजने चालणार आहे. असे हे मंगलमय वातावरण अनंत चतुदर्शीपर्यंत पहायला मिळणार आहे. 

फोटोओळी – घरोघरी ब्राह्मणांचा मंत्रघोषात गणपतीचे पूजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here