एखादी व्यक्ती व्यसनाधीन होण्याची कारणे 30 टक्के शारीरिक असतात, म्हणजे व्यसनाधीन पदार्थांवर अवलंबून असतात, तर 30 टक्के कारणे मानसिक आणि 40 टक्के कारणे ही आध्यात्मिक स्वरूपाची असतात. तसेच ‘एक्झिमा’ या आजाराची (त्वचारोग) 30 टक्के प्रकरणे ही केवळ आध्यात्मिक स्वरूपाची असतात. अशा वेळी अध्यात्मशास्त्रानुसार योग्य साधना आणि नामजप, प्रतिदिन 15 मिनिटे मिठाच्या पाण्यात पाय ठेवण्याचे उपाय केले, तर व्यसने अन् विकार यांवर लवकर मात करता येते, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने श्री. शॉन क्लार्क यांनी केले. फरिदाबाद येथे झालेल्या ‘सी 20 इंटेग्रेटेड होलिस्टिक हेल्थ समिट’मध्ये ‘अध्यात्माद्वारे व्यसनाधीनता आणि एक्झिमा यांवर मात कशी करता येते’, या विषयावर शोधनिबंध सादर करतांना ते बोलत होते.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-जावा-येझदीची-पुण्यात-मह/
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन गटातील सदस्य श्री. शॉन क्लार्क आणि संशोधन समन्वयक सौ. श्वेता क्लार्क या आंतरराष्ट्रीय परिषदेत भाग घेतला. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर संशोधन गटातील श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यु.ए.एस्.) या उपकरणांद्वारे संशोधन करण्यात आले. यापूर्वी 20 ते 22 मार्च 2023 या कालावधीत नागपूर येथे झालेल्या ‘सी 20’ इन्सेप्शन कॉन्फरन्स’मध्येही ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चा सहभाग होता.