भारताचे प्रेरणादायी नेते डॉ. बी. आर. आंबेडकर यांची अभूतपूर्व कथा सादर करत भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.तरूण ‘भीमराव आंबेडकर’ची भूमिका साकारण्यासाठी अथर्व कर्वेची निवड करण्यात आली असून आणि ‘रमाबाई आंबेडकर’ची भूमिका श्रावणी अभंग साकारणार आहे. भीमराव आंबेडकरांची भूमिका साकाणारा अथर्व कर्वे यांनी या भूमिका साकारण्यासाठी निवड होणे हा माझा मोठा सन्मान आहे अशा शब्दात वर्णन केले.
बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमिका साकारणे म्हणजे माझे स्वप्न पूर्ण होत आहे.असेही त्याने म्हंटले आहे. बाबासाहेबांचे जीवन व वारसा अनेकांसाठी प्रेरणास्रोत राहिले आहे. त्यांची प्रतिभा व यशस्वी कामगिरीची यादी अतुलनीय आहे. उत्तम विचारवंत, नेते, सामाजिक सुधारक, कट्टर राष्ट्रप्रेमी व अर्थशास्त्रज्ञ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार. डॉ. बी. आर. आंबेडकर हे सर्वोत्तम नेते होते आणि त्यांचा वारसा अद्वितीय आहे. त्यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व कोणाचेच नाही आणि समाजाप्रती त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. अशी प्रभावी भूमिका साकारणे मोठी जबाबदारी आहे आणि माझ्यासाठी हा मोठा क्षण आहे.’
रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारणारी श्रावणी अभंगही सामाबाईंची भूमिका साकारत आल्यामुळे स्वतःला भाग्यवान समजते आहे. रमाबाई भीमराव आंबेडकर सामाजिक न्यायाचे द्योतक डॉ. भीमराव आंबेडकरांसाठी महत्त्वपूर्ण प्रेरणास्रोत राहिल्या आहेत. सर्वांना रमाबाईंबाबत खूपच कमी माहित आहे. म्हणूनच या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना त्यांच्याबाबत आणि त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनात बजावलेल्या भूमिकेबाबत माहित होईल. रमाबाई आंबेडकर या बाबासाहेबांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्या नम्रता, प्रामाणिकपणा व करूणेच्या प्रतीक होत्या. रमाबाई आंबेडकर यांच्याकडून शिकण्यासारखे भरपूर काही आहे. मला ही भूमिका साकारण्याची आणि प्रेरणादायी मालिकेची भाग होण्याची ही संधी दिल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे आणि अभिमानही वाटत असल्याचे तिने सांगितले आहे.