एनडीटीव्हीचे कार्यकारी संपादक आणि पत्रकार कमाल खान यांचे हृदयविकाराने निधन झाले. शुक्रवारी सकाळी 7.30 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते 61 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी रुची आणि मुलगा अमन आहेत. कमाल खान याना पत्रकारितेतील अतुलनीय योगदानाबद्दल रामनाथ गोएंका आणि राष्ट्रपतींच्या हस्ते गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कार मिळाला होता.आजचा दिवस NDTV साठी खूप वाईट आहे. आम्ही कमाल खान गमावला आहे.आमच्या लखनऊ ब्युरोचे ते आत्मा होते अशा शब्दात एनडीटीव्हीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


