महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट -ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2020 येत्या 4 सप्टेंबर म्हणजे शनिवारी घेण्यात येणार आहे. एमपीएससीच्या परिक्षार्थींसाठी रेल्वे प्रासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या परिक्षार्थींना रेल्वे प्रशासनाने लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे उद्या त्यांना लोकलने प्रवास करता येणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने एमपीएससीच्या परीक्षार्थींना त्यांचे हॉल तिकीट दाखवून त्यांना लोकल तिकिट खरेदी करुन प्रवास करता येईल असे सांगितले आहे. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे नियम पाळावे लागणार –
– परिक्षार्थीची थर्मल गनद्वारे तापमान तपासणी होणार
– मास्क वापरणे आवश्यक
– परिक्षार्थीच्या ओळखीचा पुरावा आवश्यक
– स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईलवर बंदी
– पुस्तक, बॅग्स, पॅड, पाऊच, कॅल्क्युलेटर वापरास बंदी