ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एलपीजी सिलिंडरवर सबसिडी पुन्हा सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अनेकवेळा ग्राहकांच्या खात्यात सबसिडी न मिळाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र आता सबसिडी सुरू झाल्यानंतर तक्रारी येणे बंद झाले आहे. माहितीनुसार आता एलपीजी गॅस ग्राहकांना 79.26 रुपये प्रति सिलिंडर सबसिडी म्हणून देण्यात येत आहे
अनेक महिन्यांनंतर लोकांच्या खात्यात सबसिडी येऊ लागली आहे. पण लोकांशी संवाद साधल्यानतंर कळाले की अनेकांना वेगवेगळी सबसिडी मिळत आहे. त्यामुळे नेमकी किती सबसिडी मिळतेय याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे अनेकांना 79.26 रुपये तर अनेकांना 158.52 रुपये की 237.78 रुपये सबसिडी मिळत आहे. कोरोना महामारीमुळे एलपीजी सुविधेत अडचणी येत होत्या मात्र आता सर्वसामान्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून घरगुती गॅस पुरवठ्याची सेवा वेगवान करण्यात आली आहे
तुमच्याकडे गॅस कनेक्शन असल्यास तुम्ही तुमचा आधार क्रमांक तुमच्या गॅस कनेक्शनशी लिंक करून थेट तुमच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम मिळवू शकता. असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचा आधार क्रमांक तुमच्या गॅस कनेक्शनशी लिंक करू शकता. तुमचे गॅस कनेक्शन मोबाईल क्रमांकाशी जोडलेले असेल तर ते निवडा, नसल्यास 17 अंकी एलपीजी आयडी टाका. एलपीजी आयडी प्रविष्ट केल्यानंतर व्हेरिफाय करा आणि सबमिट करा. बुकिंगच्या तारखेसारखे काही तपशील भरा. यानंतर तुम्हाला सबसिडीची माहिती दिसेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ग्राहक सेवा क्रमांक 1800-233-3555 वरून देखील माहिती मिळवू शकता.