मुबंई- महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने संपातून माघार घेऊनही एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाशिवाय माघार न घेण्याची भूमिका घेतल्याने सेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे सोमवारी( ता.10 ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी एकदा प्रवाशांचाही विचार करावा.मी प्रश्न सोडविण्यासाठी इथे आलो आहेराजकारण करण्यासाठी नाही.प्रश्न सुटणे महत्वाचे आहे गैरसमज पसरवणे,दिशाभुक करणे अशा प्रकारचे राजकारण करून प्रश्न सुटत नाहीत. एसटी संपाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.असे पवार साहेबांनी बैठकीत सांगितले. तर पवार साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून कामावर परता, असे आवाहन कृती समीतीच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे
राज्यात दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. काही कर्मचारी कामावर परतले असले तरी अजूनही अनेक एसटी कर्मचारी संपातून माघार घ्यायला तयार नाहीत. अजूनही विलनिकरणाच्या मागणीसाठी संपकरी कर्मचारी ठाम आहे.