राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरण करावे या मागणीसाठी ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. एसटीच्या संपामुळे सामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. तर एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून त्यांनी आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील एसटी आगारतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे त्यामुळे एकही एसटी रस्त्यावर धावत नाही. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. मुंबई हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांना संप थांबवण्याचे आदेश दिले आहेत तरी सुद्धा संप सुरुच आहे. त्यामुळे आतापर्यंत ८०० संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. आज पुन्हा एकदा एसटी महामंडळाने पत्राद्वारे एसटी कर्मचाऱ्यांना संप बंद करण्याची विनंती केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते.
‘कोरोना महामारीने सगळेच आर्थिक संकटात आहोत हा तोटा भरून काढायला हवा आहे या संपामुळे एसटी आणखीन तोट्यात जाईल. एसटीचा संचित तोटा 12000 कोटी रुपयांपर्यंत गेला असताना सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांचे गेल्या 18 महिन्याचे वेतन एसटी महामंडळाने दिले आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून आतापर्यंत 3,549 कोटी रुपयांचा आर्थिक निधी प्राप्त झाला आहे. यापुढे देखील आपल्या सर्वाचे वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता या मागण्या मान्य केल्या आहेत. विलानीकरणाच्या निर्णयाला वेळ लागणार आहे तोपर्यंत संप चालू थू नका.कामावर हजर व्हा आणि नागरिकांना सहकार्य करा अशा आशयाचे विनंतीपत्र आज सादर करण्यात आले आहे.


