राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार 7 व्या वेतन आयोगाच्या जवळपास देण्यात येणार आहे. 10 तारखेच्या आत जर पगार झाला नाही तर त्यांची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे असे सांगितले आहे. याआधी एसटी कर्मचाऱ्यांना मानधन कमी होते हे मान्य आहे. मात्र, आता बऱ्यापैकी मानधनात वाढ केली आहे. आता त्यांना वेळेतच पगार दिला जाणार असून, त्याला राज्य सरकार बांधील आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आता समजूतदारपणाची भूमिका घ्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत रुजू व्हावे, अन्यथा कडक भूमिका घेण्यात येईल, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केले आहे. संप मागे घ्या असे आवाहन त्यांनी केले आहे.


