एसटी चालकाची आत्महत्या – मनाला चटका लावणारी!

0
149
एसटी कर्मचारी
एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत

एसटी चालकाने बसमध्येच आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रकार आज सकाळी संगमनेर बसस्थानकात उघडकीस आला. लोकांकडून घेतलेले पैसे परत वेळेत देऊ न शकल्याने आलेल्या तणावातून सुभाष शिवलिंग तेलोरे (वय ४२,)यांनी आत्महत्या केली असे समजते.


काल, सोमवारी ते नियमित प्रमाणे कामावर हजर झाले होते. पाथर्डी ते नाशिक या बसवर चालक म्हणून त्यांची ड्युटी लागली होती. त्यानुसार त्यांनी काल (एम.एच.१४ बी. टी ४८८७) ही बस पाथर्डी आगारातून ताब्यात घेतली व नाशिकच्या दिशेने रवानाही झाले. मात्र काही कारणाने बस संगमनेर आगारातच मुक्कामी थांबली. वाहक व चालक बस मध्येच झोपले होते. आज पहाटे वाहक प्रातर्विधीसाठी बसमधून बाहेर पडले. त्यानंतर तेलोरे यांनी सुती दोरीने बसच्या छताला मधोमध असलेल्या लोखंडी पाइपला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर हा प्रकार लक्षात येताच पोलिसांना कळविण्यात आले.

त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. आपल्या मुलाच्या नावाने लिहिलेल्या या चिठ्ठीत त्यांनी आपल्या मुलाला काही गोष्टी समजावले आहेत. ‘कष्टाने कमवा, कोणालाही दुखवू नका, सर्वांशी प्रेमाने वागा. फार मोठे होण्याच्या नादी लागू नका. अर्धी भाकर खा पण सुखी राहा’. विशेष म्हणजे ‘हा जन्म पुन्हा पुन्हा नाही’ असाही उल्लेख त्यांनी चिठ्ठीत केला आहे. त्याशिवाय त्यांनी ज्यांच्याकडून उसने पैसे घेतले होते त्यांच्या नावासह रकमा लिहिलेल्या आहेत. आपल्या मृत्यूनंतर एसटीकडून जे पैसे मिळतील त्यातून ही देणी द्यावीत असेही त्यात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here