एसटी विलीनीकरणबाबत राज्य सरकार आज कोर्टात भूमिका मांडणार, त्रिसदस्यीय समितीचा अहवालावर होणार सुनावणी

0
76
एसटी कर्मचारी
एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत

प्रतिनिधी -अभिमन्यू वेंगुर्लेकर

मुंबई- मागील चार महिन्यापेक्षा अधिक काळ एसटी कर्मचारी राज्य शासनात आपले विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी संप करत आहेत. दरम्यान एसटी संपाबाबत मागील आठवड्यात विधान भवनात महत्त्वाची बैठक झाली. बैठक विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात झाली. एसटी संपाबाबतची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच यातून तोडगा निघण्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात येत आहे. परिवहन मंत्री अनिल परब विधानपरिषदेत निवेदन दिले आहे. या बैठकीत सर्वपक्षीय आमदारांची समितीचे आणि एसटी कामगार प्रतिनिधींचे एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एसटीचा प्रदीर्घ काळ सुरु असलेला संप मिटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होणार की नाही याबाबत सरकार आज उच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट करणार आहे. त्रिसदस्यीय समितीचा अहवाल राज्य सरकारनं उच्च न्यायालयात आधीच सादर केला होता. या समितीनं एसटीच्या विलिनीकरणाविरोधात मत नोंदवलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

आज राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे एसटी कर्मचाऱ्यांसह जनतेचंही लक्ष लागलंय. दुसरीकडे विरोधकही या मुद्यावर आक्रमक झालेत. एसटी संपावर तोडगा निघाला नाही तर सभागृह चालू न देण्याचा इशारा भाजपनं दिला आहे. विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेले चार महिने संपावर आहेत. त्यामुळे राज्यभरातील एसटी सेवा ठप्प आहे. यामुळं एसटी, कर्मचारी तसेच राज्य शासनाचे सुद्धा आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळं आज काय सुनावणी होणार आहे, याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here