ऑस्ट्रेलिया मध्ये एक प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण शहर सील करण्यात आले.यूकेमध्येही असेच करण्यात आले आहे. यूकेमध्ये, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला बूस्टर दिले जात आहे. ऑस्ट्रेलियात आणि यूकेमध्ये लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत, कारण लसीशिवाय कोरोनाला रोखणे कठीण आहे हे येथील लोकांना पटवून देण्यात सरकार यशस्वी झाले आहे. कोरोनावर अद्याप कोणताही निश्चित उपचार नाही. विषाणूविरोधी औषधे देऊनच संसर्ग रोखला जातो.
ओमायक्रॉनवर सध्या मर्यादित डेटा आहे. आतापर्यंत, ज्या देशांमध्ये त्याची प्रकरणे आढळून आली आहेत, त्या सर्व देशांमध्ये कोणतीही गंभीर समस्या समोर आलेली नाही ही एकच जमेची बाजू आहे आणि या लोकांचे कोरोनाच्या दोन्ही डोसचे लसीकरण झाले आहे. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे ओमायक्रॉनच्या होत आहे.
कदाचित अशीच पुढील काही वर्षे दरवर्षी कोविडची लस घ्यावी लागेल. जोपर्यंत प्रत्येकामध्ये प्रतिकारशक्ती विकसित होत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहील. कदाचित वर्षभर हे सर्व चालेल असे यूकेस्थित ग्लोबल हेल्थ अलायन्सचे संस्थापक आणि संचालक डॉ. नारायण यांचे म्हणणे आहे.