राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. 31 डिसेंबर आणि कोरोना रुग्णांमध्ये होणार वाढ लक्षात घेता आजपासून मुंबईतील नागरिकांसाठी नवे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्यातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा धोका देखील दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. नागरिकांना संध्याकाळी 5 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत शहराला लागून असलेले समुद्रकिनारे, मोकळी मैदाने, समुद्राचे दर्शनी भाग, सार्वजनिक उद्याने त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध पुढील 15 जानेवारीपर्यंत लावण्यात आले आहेत.मुंबई पोलिसांनी हा आदेश काढला आहे
दरम्यान, मुंबईत कोरोनाचा पुन्हा एकदा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. चिंतेची बाब म्हणजे ओमिक्रॉन रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबईसह राज्यात आहे.तर आज पासून म्हणजेच मुंबईकरांसाठी नवी नियमावली लागू होणार आहे.तरी देखील 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी मुंबई पोलिसांनी नवी नियमावली जारी केली आहे. राज्यातील पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, गर्दी होणारी ठिकाणांवर देखील निर्बंध लावण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. लग्न देखील 50 पाहुण्यांमध्ये उरकावे लागणार आहे. तर अंत्यसंस्कारांसाठी केवळ 20 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.