ओमिक्रॉन: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अतिरिक्त निर्बंध लागू-जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

0
132

कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार जगभरात वेगाने पसरत आहे. राज्यातही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्गजिल्ह्यासाठी जिल्ह्यासाठी अतिरिक्त निर्बंध लागू करण्याचे आदेश आज दिले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता कोविद१० ओमिक्रोन विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी निर्बंध लावण्या संदर्भात सध्या असलेले निर्बंध कायम ठेऊन पुढील अतिरिक्त निरबंध पुढील आदेश पावेतोपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू होत आहेत. १- लग्नसमारंभासाठी बंदिस्त सभागृहात जास्तीत जास्त 100 लोकांना परवानगी असणार आहे आणि मोकळ्या जागेत जास्तीत जास्त 250 किंवा त्या जागेच्या प्रत्यक्ष क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल एवढ्या लोकांना परवानगी असेल


इतर सामाजिक राजकीय किंवा धार्मिक कार्य आणि मेळाव्यांच्या बाबतीत उपस्थितांची उपस्थिती बंदिस्त सभागृहासाठी जास्तीत जास्त 100 आणि मोकळ्या जागेत 250 किंवा त्या जागेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल एवढे असेल
इतर कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत तिथे आसन क्षमता निश्चित अशा ठिकाणी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गर्दी करू नये
क्रीडा स्पर्धा खेळाचे समारंभ यासाठी आसनक्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती करू नये
इतर प्रकारात मोडणारे समारंभ आणि एकत्र येण्याच्या कार्यक्रमात त्या त्या विभागातील विभागीय अधिकारी उपस्थित लोकांची संख्या किती असेल हे निश्चित करतील.
29 नोव्हेंबर 19 21 रोजी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात आलेल्या आदेशांचा पालन होईल याची दक्षता घ्यावी
उपहारगृहे, व्यायाम शाळा, चित्रपट गृह,स्पा या ठिकाणी त्यांना परवानगी दिलेल्या अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तीना एकत्र येण्यास रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत बंदी असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर आस्थापना शासनाने यापूर्वी घातलेल्या निर्बंधानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल
तसेच भारतीय दंड संहिता १८६० कलम १८८, २६९, २७०,२७१ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ सहा अन्य कायदेशीर शिक्षेस पात्र राहील नुसार पात्र आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here