रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत भगवान रामच्या भूमिकेत अभिनेते अरुण गोविलना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आता अभिनेते अरुण गोविल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर श्री रामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पुन्हा एकदा अरुण गोविल ‘ओह माय गॉडच्या’ सिक्वेलमध्ये भगवान रामची भूमिका साकारणार आहे.
श्रीरामाच्या भूमिकेसाठी अरुणपेक्षा अधिक परिचित दुसरा चेहरा नाही, असे अक्षयचे मत आहे. ‘OMG 2’ ची निर्मिती अश्विन वर्दे आणि अक्षय कुमार करत असून दिग्दर्शक अमित राय व निर्मात्यांनी मिळून श्रीरामाच्या भूमिकेसाठी अरुणला घेण्याचा निर्णय घेतला आहे.अक्षय कुमार व्यतिरिक्त, ‘ओह माय गॉड 2’ मध्ये पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट भारतीय शिक्षण व्यवस्थेवर आधारित असेल.


